fbpx

पंढरपूरची चिंता वाढली! आज आढळले १३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे

पंढरपूर,दि.१२ : आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालामध्ये (महानगरपालिका क्षेत्र वगळून) सोलापूर जिल्ह्यातील एकूण तालुक्यांमधील ३४४ रुग्णांपैकी एकट्या पंढरपूर तालुक्यात १३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

पंढरपूर तालुक्यात आज प्राप्त झालेल्या, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र अहवालानुसार १३६ जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे. आज पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १३५० झाली असून, ८३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज पर्यंत ४९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज पर्यंत २६ जण मरण पावले आहेत.

पंढरपूर तालुक्यामध्ये, कोरोना अॅंटीजन रॅपिड टेस्ट पथकांमार्फत घेण्यात येणाऱ्या टेस्टमधून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. सध्या पंढरपूर शहर व परिसरामध्ये ६ ऑगस्ट पासून ७ दिवसांसाठी लॉकडाऊन सुरू आहे. या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या कोरोना अॅंटीजन रॅपिड टेस्ट यांनी पंढरपूरकरां साठी रॅपिड झटका दिला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज १०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या ही पंढरपूर करांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक १३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. पंढरपूर नंतर बार्शी(६५), सांगोला( ३१),माळशिरस (२३) दक्षिण सोलापूर (१९),उत्तर सोलापूर (१५), मंगळवेढा (१४), करमाळा (१३), माढा(११), मोहोळ (०९), अक्कलकोट(०८) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *