सोलापूर : अवैधरित्या वाळू वाहतुक करणाऱ्या इसमांकडून २६ लाख २८ हजार रुपयांंचा मुद्देमाल जप्त,पोलीस अधिक्षक पथकाची कामगिरी.
अवैधरित्या वाळू वाहतुक करणाऱ्या इसमांकडून २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सविस्तर वृत्त असे की, १३ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक पथकाती पोलीस निरीक्षक विनय बहिर व त्यांचे सहकारी कामती पोलीस ठाण्याचे हददीत मोटारसायकलने पेट्रोलींग करत कुरूल रोडने जात असताना विजु धाब्याजवळुन एक हायवा जात असताना दिसला व हायवामधुन जमिनीवर पाणी गळत असल्याने हायवामध्ये वाळु असण्याची शंका आल्याने पथकाने हायवाचा पाठलाग करून काही अंतरावर हायवा थांबवुन त्यामध्ये पाहिले असता हायवामध्ये वाळु दिसुन आली. त्यानंतर हायवा चालकास वाळुची रॉयल्टी आहे का असे विचारले असता त्याने नाही असे सांगीतले व सदरची वाळु ही शिंगोली गावातुन सिना नदीपात्रातुन चोरून आणल्याचे सांगीतले. त्यानंतर सदरचा हायवा पोको मदने यांचे ताब्यात देवुन कामती पोलीस ठाणेकडील पोहेको माने यांना सोबत घेवुन शिंगोली येथील सिना नदीवर गेले. त्यानंतर सिना नदी पात्रात एक स्वराज ट्रॅक्टर विनाक्रमांकाचा यारीसहीत दिसुन आला. त्यानंतर सदर ट्रॅक्टरचालकांचे मालकाबाबत विचारणा केली असुन सदर ट्रॅक्टर चालकांने सांगीतले की मालक हा तुम्हाला पाहताच उसाच्या फडामध्ये पळुन गेला असुन त्यांचे नाव मला माहित नाही. त्यानंतर पोहेको माने यांनी पंचनामा करून ट्रॅक्टर यारीसह ताब्यात घेतला.
सदर वेळी २०,००,०००/- रू. किंमतीचा टाटा कंपनीचा हायवा, ८०००/- रू. किमतीची ०४ ब्रास वाळु, व ०६,००,०००/- रू. किंमतीचा एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ज्यास एक यारी व त्याला जोडलेले एक लोखंडी खोरे असा एकुण २६ लाख २८ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदरबाबत पोकॉ कल्याण विठठल भोईटे यांनी शिंगोली गावचे जवळील सिना नदीपात्रातुन पर नमुद आरोपीतांनी संगनमत करून विनापरवाना शासनाची कोणत्याही प्रकाराची रॉयल्टी न भरता वाहनामध्ये वाळु चोरी करताना मिळुन आल्याने त्यांचेविरूध्द भा.द.वि.क ३७९,३४ अन्वये फिर्याद दिली असुन पुढील तपास कामती पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक पथकांचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांचे नेतृत्वाखाली पोको भोईटे, पोको मदने, पोकों हेमाडे, पोकों झिरपे यांनी सदरची कामगिरी बजावली आहे.