fbpx

कारी येथील रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

आसिफ मुलाणी कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. देवेंद्र डोके मित्र मंडळ, याराणा ग्रुप, मावळा ग्रुप, जय हिंद ग्रुप, छत्रपती ग्रुप, पंचशिल ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन महादेव मंदिर याठिकाणी करण्यात आले होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. रक्तदात्यांना श्री. भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्याकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले.

यावेळी डॉ. देवेंद्र डोके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजित डोके, ग्रा पं सदस्य राजाभाऊ गादेकर, ग्रा पं सदस्य ईलाई मुलाणी, सचिन शिंदे, दिपक डोके, शशिकांत माळी, अमर येडवे, विकास गादेकर, राहुल डोके, गोविंद डोके, खंडू हाजगुडे, प्रदीप चव्हाण, दिलीप भराडे, रोहन गादेकर, अमोल डोके यांच्यासह श्री भगवंत ब्लड बँक चे नितीन घाडगे, विजय तोडकरी, प्रितम जाधव, प्राजक्ता शिरसठ, तृप्ती जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *