fbpx

बार्शी तालुक्याच्या १०१ गावांतील दलित वस्त्यांच्या विकासासाठी ४ कोटी ७७ लाख निधी मंजूर- आ. राऊत

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी :
भाजपा जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत व तेथील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार माझ्याकडे सदरची कामे सुचविली. त्यांनी सुचविलेल्या विकास कामांकरीता मी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे पत्राद्वारे सदरच्या कामांची व त्यांच्या निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार बार्शी तालुक्यातील १०१ गावांतील, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता ४ कोटी ७७ लाख ९६ हजार रुपयांचा निधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

सदरचा निधी बार्शी तालुक्यातील गोरमाळे, धोत्रे, उक्कडगाव, घोळवेवाडी, घारी, जामगाव पा, आंबेगाव, आळजापुर, सावरगाव, झाडी, इंदापूर, भातंबरे, सारोळे, उपळे दु, गौडगाव, संगमनेर, निंबळक, पांगरी, आगळगाव, कुसळंब, देवगाव, कांदळगाव, भांडेगाव, पिंपळगाव धस, सौंदरे, ममदापूर, बावी आ, मळेगाव, घाणेगाव, हिंगणी, पिंपळगाव पा, तांदुळवाडी, पाथरी, साकत, महागाव, हळदुगे, धामणगाव दु, रातंजन, ज्योतीबाचीवाडी, लाडोळे, भोईंजे, काटेगाव, खडकोणी, खांडवी, कोरफळे, कव्हे, कासारवाडी, उपळाई ठों, सासुरे, सुर्डी, राळेरास, श्रीपत पिंपरी, इत्यादी १०१ गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता वापरण्यात येणार असून, त्यामध्ये या दलित वस्त्यांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण, हायमास्ट दिवे लावणे, एल.ई.डी. स्ट्रीट लाईट बसविणे, पेविंग ब्लॉक रस्ता करणे, नवीन गटार बांधकाम, नवीन बंदिस्त गटार बांधणे, समाज मंदिर बांधणे, आरओ प्लांटची उभारणी करणे ‌इत्यादी प्रकारची विकास कामे करण्यात येणार आहेत.

यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, माजी जि‌.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर, जि.प.सदस्य मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, प्रमोद वाघमोडे, अविनाश मांजरे, इंद्रजीत चिकणे, राजाभाऊ धोत्रे, सुमंत गोरे, उमेश बारंगुळे उपस्थित होते.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *