fbpx

पीक विम्यासाठी ४० हजारांवर अर्ज, पुढील काळात तीव्र लढा उभारणार: आ. राणाजगजितसिंह पाटील

कुतूहल न्यूज नेटवर्क : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ५८४ शेतकरी हकाच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज द्यावेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्याकडे पाठवावेत असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ४० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे अर्ज केले आहेत व अनेक ग्रामपंचायतीने ठराव केले आहेत. विशेषता तुळजापूर तालुक्यातील सर्वच म्हणजे १०८ ग्रामपंचायतीने ठराव घेत शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसानभरपाई देण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२० हंगामातील पीक विमा अजून मिळालेला नाही. राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करत मोजक्या शेतकऱ्यांना अनुदान दिले परंतु विमा भरपाई बाबत प्रयत्न करून देखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.

आता न्यायालयीन रणनिती म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन रीतसर पोच घ्यावी. तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीने ठराव घेऊन शेतकर्‍यांच्या हक्काची नुकसानभरपाई देण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे. उर्वरित ग्रामपंचायतीने सुद्धा ठराव घ्यावे व शेतकऱ्यांनीही कृषी सहाय्यकाकडे लवकरात लवकर अर्ज करावेत असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून राज्य सरकारने बळीराजाच्या अर्थ सादेला प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात आपण तीव्र लढा उभारू, राणाजगजितसिंह पाटील, आमदार तुळजापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *