कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
आज सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरूच होती. अशा पावसातच नागरिक छत्री घेऊन तर कोणी घोंघता डोक्यावर घेत तर काहींनी पावसात भिजत लसीकरण केंद्रावर जाऊन लस टोचून घेतली. लसीकरणाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
भर पावसात कारीकरांचा लसीकरणाला प्रतिसाद, ४५० जणांनी घेतली लस
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (दि.७ सप्टेंबर) मंगळवार लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. येडशी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १८ वर्षावरील नागरिकांना कोव्हीड १९ कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात आले. याठिकाणी लस घेण्यासाठी महिला, पुरुष, युवक, वृद्धांनी, लांब रांगा लागल्या होत्या. कारी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ४५० जणांना प्रतिबंधक लस टोचण्यात आली.
यावेळी सरपंच नीलम कदम, उपसरपंच खासेराव विधाते, गटविकास अधिकारी तायडे, विस्तार अधिकारी हजारे आर. यु., वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के, आरोग्य सहाय्यक पी. एस. पांचाळ, आरोग्य सहाय्यीका एच. एस. घोळवे, सी. एच. ओ. डॉ उमादेवी पांचाळ, डॉ प्रतिक धावारे ,ग्रा पं सदस्य अमोल तेलंगे, ग्रा पं सदस्य अतुल चालखोर, अनिल कदम, अशोक डोके, रवींद्र आटपळकर, पोलीस पाटील अमृता माळी, आरोग्य सेविका ए.बी.उमरदंड, सोलार, एच. एस. घोळवे, आरोग्य सेवक राहुल पतंगे, आर. जी मुळे, बी. आर. जगताप, एस. एन. कुंभार, गजानन सुतार, पी. बी पाटील, डाटा ऑपरेटर सोनू शिंदे, आशा सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.