आसिफ मुलाणी कुतूहल न्यूज नेटवर्क
लोकराज्यच्या रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला
बार्शी तालुक्यातील खामगाव येथे नेहमीच सामाजिक कार्यात आग्रही असलेल्या लोकराज्य सामाजिक संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सध्या कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
या शिबिराचे उद्घाटन पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या हस्ते करण्यात आले,या शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आले.
यावेळी माजी सभापती युवराज काटे, सुरेश मोहिते, राजेंद्र काटे, विनोद काटे, गणेश मुठाळ, गावातील युवक , ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लोकराज्य सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.