fbpx

दिलासादायक बातमी : सोलापुरातील 7 रुग्ण झाले बरे ; आज सोडणार घरी…

सोलापुर : कुतूहल न्यूज नेटवर्क

सोलापुरातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी कोरोना रुग्णांना त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

सोलापुरात सध्याला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .त्याच सोबत काल एका दिवसात 21 नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली .मात्र त्याच सोबत काल 3 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते.आज शुक्रवारी सायंकाळी 7 रुग्णांना त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात येणार आहे. रुग्ण बरे होत आहेत ही मोठी जमेची बाजू दिसून येत आहे.

सोलापुरातील 7 रुग्णांचे रिपोर्ट दुसऱ्यांदा निगेटिव्ह आले आहेत. आज ५ वाजता करोना निगेटिव्ह झालेल्या या रुग्णांना घरी पाठवत आहोत. त्यांचा विशिष्ट असा कालावधी पूर्ण झाला आहे आणि कोरोना संदर्भातील सर्व वैद्यकीय चाचण्या निगेटिव्ह आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *