fbpx

वसंतराव काळे प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे

पंढरपूर : वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी, मार्च २०२० आणि फेब्रुवारी २०२० या शैक्षणिक वर्षा मधील यशस्वी विद्यार्थी; इयत्ता १० वी मध्ये कु.पुजा सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवला तर,कु.रोहिणी काळे व कु.समृध्दी सावंत यांनी अनुक्रमे दुतीय व तृतीय क्रमांक मिळवला.तसेच इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत, प्रथम कु.सानिया शेख, द्वितीय कु.कोमल सुरवसे,तृतीय कु.अक्षदा पंडीत आणि कला शाखेत,प्रथम कु. प्रथमेश यलमार, द्वितीय कु.चेतक येड्रावकर,तृतीय कु.किरण डावरे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच प्रशालेचे शिक्षक श्री.एल.डी. मिसाळ सर यांनी अध्यापनाचा सेवा काळ यशस्वीरित्या पुर्ण केला. आपल्या सेवेतून सेवा वयोमानानुसार सेवा निवृत्त झालेबद्दल श्री.एल.डी. मिसाळ सर यांचाही उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

“गुणवत्ता वाढीसोबत विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव देत स्वतः मध्ये बदल करणे अपेक्षीत आहे, प्रयत्न आणि सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते” असे प्रोत्साहनपर शब्द उपस्थित मान्यवर,मा. श्री.कल्याणराव काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी, सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *