कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे
साहित्यसम्राट आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्धी दिनानिमित्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना संविधान व फकीरा कादंबरीची पुस्तकरुपी प्रत भेट
मोहोळ : युवा भीम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मोहोळ तालुक्याच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्धी दिनानिमित्त मोहोळ तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘संविधान व फकीरा’ कादंबरीची पुस्तकरुपी प्रत भेट देण्यात आली.
युवा भीम सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष युवराज सकट यांच्या नेतृत्त्वाखाली युवा भीम सेना संघटनेचे मोहोळ तालुका अध्यक्ष युवराज रणदिवे, अविनाश काळे, अजित पवार, सतीश अष्टूळ यांनी मोहोळचे तहसिलदार जीवन बनसोडे व गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांना देण्यात आली.
अनावश्यक खर्च न करता या अभिनव उपक्रमांच्या कार्याची युवा भीम सेना संघटनेच्या कार्याची सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.