fbpx

पंढरपूर मध्ये लॉकडाऊन कधी होणार ; जिल्हाधिकार्‍यांनी केले जाहीर

कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे

पंढरपूर : जिल्हाधिकारी यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत पंढरपूर शहर व परिसर संपूर्ण लॉकडाऊन करण्याची तारीख जाहीर केली.

पंढरपूर तालुक्यात दि. ३ ऑगस्ट पर्यंतच्या आकडेवारीनुसार पंढरपूर मध्ये एकूण २७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार चालू आहेत. पंढरपूर तालुक्यातील एकूण ५८५ रुग्णांपैकी २९५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच १८ जण मयत पावले आहेत.

पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ३० जुलै रोजी पंढरपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी, जिल्हा पातळीवर चर्चा करून पंढरपूर मध्ये लॉकडाऊन करायचा कि नाही हे जाहीर करू असे जिल्हाधिकारी श्री.मिलिंद शंभरकर यांनी सांगितले होते. पंढरपूर व परिसरातील लोकांमध्येही पंढरपूर केंव्हा लॉकडाऊन होणार याविषयी चर्चा होत असत. मनसे तर्फे पंढरपूर मध्ये लॉकडाऊन करण्यात यावे असे निवेदनही प्रांत अधिकारी श्री.सचिन ढोले यांना दिले होते.

मंगळवारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पंढरपूर मध्ये, दि.६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते १३ ऑगस्ट च्या मध्यरात्री पर्यंत एकूण सात दिवस पंढरपूर शहर व परिसरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. गरज भासल्यास आणखी ३ दिवस लॉकडाऊन वाढवण्यात येईल. या कालावधीत विठ्ठल मंदिर परिसरातील कोरोना टेस्टचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. लॉकडॉऊन कालावधीमध्ये दवाखाने व मेडिकल स्टोअर चालू राहतील असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *