fbpx

पंढरपूर मध्ये गॅस चा स्फोट ; एक मोटरसायकल जळून खाक

कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे

पंढरपूर : आज दुपारी 12 च्या सुमारास महात्मा फुले चौकातील फुले यांच्या पुतळ्या मागील गजबजलेल्या संत पेठ परिसरात अचानक घरगुती गॅस चा स्फोट झाला. यामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महात्मा फुले चौकातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती गॅस एका टाकीमधून दुसऱ्या टाकीमध्ये भरत असताना स्फोट झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक मोटर सायकल जळून खाक झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग विझवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पूर्ण तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *