सदर मयतामध्ये कोणताही धागा दोरा नसताना पांगरी पोलीसांनी अनोळखी मयताचे हातातील राखीवरून लावला तपास.
विहीरीत सापडलेल्या बेवारस मयताच्या आरोपींना पांगरी पोलीसांनी ६ तासांच्या आत ठोकल्या बेडया
कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : पांगरी शिवारात रेल्वे रुळा लगतच्या (जहानपूर रोड ) बेवारस मयताच्या खुनातील आरोपींचा पांगरी पोलीसांकडुन ६ तासांच्या आत शोध लावुन आरोपीस ठोकल्या बेडया.
दि. ८ ऑगस्ट २०२० रोजी जैनुद्दीन गनी शेख रा पांगरी यांनी त्यांचे शेतामधील विहीरीमध्ये अनोळखी इसमांचे प्रेत पाहिल्यानंतर पांगरी पोलीस ठाणे येथे खबर दिली होती. सदर मयातचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिरसाट यांच्याकडे दिला होता.
पोलिसांनी लागलीच त्या विहीरीवर जावून विहीरीमध्ये पाण्यावर तरंगत असलेले कुजलेले मयत बाजेस दोऱ्या बांधुन वरती काडून मयताचा पंचनामा केला. त्यावेळेस अनोळखी मयताचा लाईटच्या केबलने गळा अवळलेला दिसला तसेच मयताचा शर्ट, बनीयान व बुट विहीरीवर ठेवलेले होते. सदर अनोळखी मयताने विहीरीमध्ये उड़ी मारून आत्महत्या केल्याचा बनाव केलेला होता. परंतु पोलीसांना सदर मयताने आत्महत्या केल्याबाबत घटना संशयास्पद वाटली.त्यानंतर सदर अनोळखी मयत हे सडलेले कुजलेले असल्यामुळे सदर मयताचे पोस्ट मार्टम पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकिय अधिकारी डॉ. माळी व डॉ.तोरड यांनी जाग्यावरच केले.
त्यावेळेस मयताचे हातास एक पिवळया धाग्याची राखी बांधलेली होती. पोालीस ठाणे हद्दीतल सर्व पोलीस पाटील व गोपनीय बातमीदार यांना त्यांचे गावामधुन कोणी व्यक्ती रक्षाबंधन दिवसापासुन बेपत्ता झाले आहे काय ? याबाबत चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी पिंपळगाव ( दे) गावचे पोलीस पाटील बाळासाहेब चांदने यांनी त्यांचे गावातील उत्तम नारायन कांबळे वय ५५ वर्षे हा रक्षाबंधनचे दिवसापासून बेपत्ता झालेला आहे असे सांगितल्याने लगेच पांगरी पोलीसांनी सदर बेपत्ता इसमाच्या घरी जावुन त्याच्या हातातील राखी व त्यांचे घरी मिळुन आलेली राखी तपासली असता ती एकसारखीच दिसुन येताच मयताचा कुजलेला सडलेला राखी व पॅन्ट असलेला फोटो व शर्ट व बुट दाखवीला असता मयताच्या नातेवाईकांनी सदरचे मयत हे उत्तम नारायन कांबळे यांचेच असल्याचे सांगितले.तसेच मयताबाबत वैदयकिय अधिकारी यांनी मयताचा गळा अवळल्यानेच मयत झाला आहे असा अभिप्राय दिल्याने पांगरी पोलीसानी अनोळखी मयताचा अज्ञात आरोपींनी केबलने गळा अवळून खुन केला याबाबत मयताच्या तपासावरून तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिरसाट यांनी अज्ञात आरोपी विरूध्द सरकारतर्फे गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांचे मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी स पो नि सुधीर तोरडमल यांनी सुरू केला. लगेच त्यांनी दोन टिम तयार करून मयत उत्तम कांबळे यांना कोणी व कशासाठी मारले याबाबत शोध घेण्यास सुरवात केली. मयत उत्तम कांबळे हा कोणासोबत राहत होता व तो कोणाकडे काम करीत होता. याबाबत पोलीसांनी मयताचे नातेवाईक यांचेकडे तपास केला असता उत्तम कांबळे हा त्यांचेच गावातील शिवाजी भिमराव बोकेफोडे यांचेकडे चार वर्षापासुन सालगडी म्हणुन काम करीत होता.मयत उत्तम कांबळे हा शिवाजी बोकेफोडे यांचेकडे कामास असताना त्यांचेत किरकोळ कारणावरून वाद झालेला होता तसेच उत्तम कांबळे ज्या दिवशी बेपत्ता झालेला होता त्या दिवशी रात्रौ ११.०० वा चे सुमारास उत्तम कांबळे हा घरी झोपला असताना शिवाजी बोकेफोडे हा त्यास मासे धरायाचे आहेत असे सांगुन सोबत घेवुन गेलेला होता. अशी माहिती मिळताच पांगरी पोलीसांनी शिवाजी भिमराव बोकेफोडे यास ताब्यात घेवून त्याचेकडे तपासीक अंमलदार सपोनि तोरडमल यांनी चौकशी केली असता त्याने सांगितले कि, माझ्या पत्नीची व मुलीची उत्तम कांबळे हा वारंवार छेड काढत असल्यामुळे आम्ही दि.०३ ऑगस्ट २०२० रोजी मी, माझा मुलगा रवी शिवाजी बोकेफोडे व आबा उर्फ राहुल उध्दव माने असे तिघांनी मिळून उत्तम कांबळे यास गोड बोलुन मासे धरण्यास जावु असे म्हणुन त्यास सोबत घेवुन पांगरी शिवारातील शेख यांच्या शेतामधील विहिरीजवळ आणुन तेथीलच केबल काढुन केबलने मयत उत्तम कांबळे याचा गळा आवळुन खुन करून विहिरीत टाकुन दिला आहे असे सांगुन त्याने कबुल केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ. सिध्देश्वर भोरे यांचे मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस ठाणेचे तपासी अधिकारी स.पो.नि. सुधीर तोरडमल, उपनिरीक्षक प्रविण सिरसाट व त्यांचेकडील टिममधील कर्मचारी पोहेकॉ सतिष कोळावळे, शैलेस चौगुले, मनोज भोसले, पोना मनोज जाधव, पांडुरंग मुंडे, कुनाल पाटील, पोकॉ सुनिल बोदमवाड, उमेश कोळी, सुरेश बिरकले, पोकॉ आतार ( सायबर सेल सोलापुर ग्रामीण) यांनी
पार पाडली,
Great job sir thank you so much all police officer team