कुतूहल न्यूज नेटवर्क
अखिल वारकरी संघाच्या गेवराई तालुकाध्यक्ष पदी सुप्रसिद्ध भारुडकार विष्णु महाराज बांडे यांची निवड
गेवराई : तालुक्यातील गोदावरी काटावरी काठोडा गावचे भुमीपुञ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाजप्रबोधकार भारुडकार हभप विष्णू महाराज बांडे याच्या धार्मिक व प्रबोधन कार्याची दखल घेत अखिल वारकरी संघाच्या गेवराई तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाजप्रबोधन पर भारुडकार हभप विष्णू महाराज बांडे याच्या धार्मिक व प्रबोधन कार्याची दखल घेत हभप मच्छिंद्र महाराज धानेपकर पाटील अध्यक्ष महाराष्ट्र अखिल वारकरी संघ यांनी हभप विष्णू महाराज बांडे याची अखिल वारकरी संघ गेवराई तालुकाध्यक्ष पदी निवड नुकतीच नियुक्ती पञ देऊन केली आहे.महाराज यांच्या निवडीबद्दल राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, सरपंच जयराम घाटुळ , श्रीराम घाटुळ , बंडू घाटुळ , सरपंच सिध्देश्वर काळे, सरपंच संदिप राजगुरु,सरपंच किरण भैय्या वावरे, कृषी अधिकारी सतिष तिष्टक, अनिरुद्ध गोरे, शिवाजी काळे. ग्रा पं सदस्य देवराज कोळे, अशोक तौर , राजु नाङे , काकासाहेब पवार , आर आर आबा बहीर, आभिजीत मरकड, रंजीत शर्मा, पञकार राजेश राजगुरु , शेख मोहमद, राहुल बेङके , महेश मस्के, सुभाष जाधव , मंगेश राऊत , आकाश चव्हाण, सार्थक मस्के , प्रदिप काळे , योगेश किरकट आदींनी अभिनंदन केले आहे