कुतूहल न्यूज नेटवर्क -विजयकुमार मोटे
पंढरपूर शहरात मनसे च्या वतीने मोठ्या उत्साहात घरोघरी गणेश मूर्तीचे वाटप
पंढरपूर : कोरोनाचे संक्रमण वाढत चालले असताना सर्व उत्सव व सणांवर शासनाने निंर्बध घातले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिकांना हा सण पुर्वीच्या जोमाने परंतु कोरोनाचे नियम पाळून साजरा करता यावा यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी ज्यांना गणेश मूर्ती हवी आहे अशा नागरिकांसाठी काही दिवसांपूर्वी मनसेकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन केले होते.
आज सकाळी १० वाजल्या पासून ज्या लोकांनी गणेश मूर्ती मिळवण्यासाठी आपले नाव नोंदणी केली आहे अशा प्रत्येकाच्या घरी जाऊन मनसे चे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोञे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर उपप्रमुख महेश पवार व सहकारी यांनी लोकांना घरपोच गणेश मूर्ती चे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूर शहरातील नागरिकांकडून देखील आपल्या घरोघरी येणाऱ्या गणेश मूर्ती चे पूजन करून स्वागत करण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी मोठ पाऊल उचलेले आहे. पंढरपूर शहरातील अनेक नागरिकांनी आपले नाव नोंदवण्यासाठी गर्दी केलेली पाहण्यास मिळत आहे. दिलीप धोञे यांनी शहरातील नागरिकांना नाव नोंदणी साठी आव्हान केलेले आहे. ज्या लोकांनी आपले नाव नोंदणी केली आहे अशा शहरातील प्रत्येक बांधवांना गणेशाची मूर्ती मिळेल असे सांगितले आहे.
कोरोना चा पंढरपूर शहरात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कुणीही गर्दी च्या ठिकाणी जावू नका फक्त आपले नाव मनसे कडे नोंदणी करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेश मूर्ती घरपोच करेल असे आव्हान मनसे चे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोञे यांनी केले आहे.