कुतूहल न्यूज नेटवर्क -प्रतिनिधी आसिफ मुलाणी
पांगरी पोलीस स्टेशन हद्दीतील एकाही गावात यंदा सार्वजनीक गणेशोत्सव नाही-सपोनि तोरडमल
कारी दि. 27 : पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या सुचनेनुसार हद्दीतील सर्व गावांमध्ये जावून गणेश मंडळाच्या अध्यक्ष आणि ग्रामस्थ यांना एकत्र बोलावून यावर्षी कोरोनाचे सर्वत्र संकट असल्याने गणेशोत्सव साध्या पद्धतीने,घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच करावे व गावात सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन केले होते.
याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून हद्दीतील असणाऱ्या सर्वच 28 गावातील मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावातील मंडळांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच उद्या दिनांक 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रक्तदान शिबिरात सर्व मंडळांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवावा असे श्री. तोरडमल यांनी कुतूहल शी बोलताना सांगितले.