कुतूहल न्यूज नेटवर्क -आसिफ मुलाणी
देशात आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे,सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी यांचे गणपती बाप्पांना साकडे
कारी : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर यांच्या वैराग येथील शाखेत बसवण्यात आलेल्या गणपतीची पूजा मळेगावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी यांच्या हस्ते करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशावर व राज्यात आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे असे साकडे गणरायाला माळी यांनी घातले.
यावेळी लोकमंगल पतसंस्थेचे शाखाधिकारी म्हेत्रे, सुरवसे व शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.