fbpx

कोरोना काळात खाकीवर्दीने समाजाशी जोडले रक्ताचे नाते

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : कोरोना काळात होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने कोविडयोद्ध्याची भूमिका बजावत पांगरी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी समाजाशी रक्ताचे नाते जोडण्याचे काम रक्तदानाच्या माध्यमातून केले आहे, असे गौरवोद्गार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ .सिद्धेश्वर भोरे यांनी काढले. पांगरी पोलीस स्टेशन, पोलीस पाटील संघटना आणि पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट,पत्रकार गणेश गोडसे,बाबासाहेब शिंदे,संजय बोकेफोडे,इरशाद शेख आदी उपस्थित होते.

या शिबिरात 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यावेळी बोलताना डॉ. भोरे यांनी गणेशोत्सव काळात रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर युवा कार्यकर्त्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी भगवंत ब्लड बँकेची सामाजिक बांधिलकीची ओळखली भगवंत ब्लड बँकेने यापूर्वी 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत वीरमरण पत्करलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे. या रक्तपेढीने बार्शी तालुक्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यकतेनुसार मोफत रक्त देण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात आणला त्यामुळे या रक्तपेढीची पोलीस खात्याबद्दल सकारात्मक भूमिका आहे हे लक्षात घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल व पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग मुंडे, कुणाल पाटील, तानाजी डोके, अर्जुन कापसे, नागेश शाहीर, संदीप कवडे तसेच भगवंत ब्लड बँकेचे गणेश जगदाळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *