कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे
चळे येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील चळे गावचे उपसरपंच यांचे बंधू विशाल मोरे यांच्या चळे हद्दीतील शेतीमधून वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये एका व्यक्तीसह एक बिगर नंबरचा ट्रॅक्टर आणि वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यारी ताब्यात घेतली आहे. तसेच वाळू उपसा प्रकरणी जे कोणी दोशी आढळून आले आहेत त्यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील दोघेजण पळून गेले आहेत. प्रांत अधिकारी ढोले यांच्यानंतर आता तालुका पोलीसानांही दिसला उपसरपंच यांच्या बंधूंचा सपशेल सहभाग.
सदरचा प्रकार शनिवार दि. 29 ऑगस्ट रोजी रोजी चळे येथील भीमा नदी पात्रात घडला आहे. त्यामुळे पोलीसांनी संबंधितावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे.मागील काही दिवसांपूर्वी पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी अचानक चळे येथे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भीमा नदी काठी गेले होते. त्यावेळी चळे गावचे उपसरपंच यांचे बंधू यांच्या शेतातून वाळू उपसा करण्याची तयारी दिसून आली होती.
शेतीतून रॅम्प काढला असल्यामुळे त्यांना महसूल विभागाच्या वतीने नोटीस काढून ताकीद देण्यात आली होती. यानंतरही असा वाईट प्रकार पोलिसांना दिसून आल्यामुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार काळे करीत आहेत. पळून गेलेले दोन जण नेमके कोण होते याकडे पोलीस लक्ष ठेऊन असून लवकरच त्यांची नावे आणि बिगर नंबर चा ट्रॅक्टर चा मालक नेमका कोण हे लवकरच समजणार आहे.