कुतूहल न्यूज नेटवर्क : दयानंद गौडगांव
भुरीकवठे ते बोळेगांव रस्त्याला खड्ड्यांचा विळखा
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा सिमेवर वसलेला भुरीकवठे या गावचा रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. सध्या रस्त्यावर खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही.

पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने खड्डा नेमका किती खोल आहे याचा वाहन चालकांना अंदाज येत नाही.रस्त्यावर पाणी दिसते पण रस्ता दिसत नाही. त्यामुळे मोठे अपघात व वाहनांची नुकसान होऊ शकते. वारंवार तक्रार करून देखील सदर रस्ता दुरूस्ती केले जात नाही. दरम्यान भुरीकवठे मार्गे जाणारा अक्कलकोट ते मुरूम पर्यंतच्या रस्त्याला केंद्र सरकारने महामार्गसाठी मंजूरी दिले आहे. पण नेमके काम कधी सुरू होणार याचा ठाम पत्ता नाही. अनेक वर्षांपासून केवळ रस्ता मंजूर झाल्याची बातमी कळते आहे. पण प्रत्यक्षात काम अजूनही चालू झालं नाही. यामुळे तालुकावासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.