कुतूहल न्यूज नेटवर्क
राज्यातील पत्रकारांसाठी सरकारने स्वतंत्र आदेश काढावेत : यासीन पटेल
रत्नागिरी : कोरोना महामारी काळात वृत्त संकलन करणाऱ्या वर्तमान पत्र व वाहिन्यांच्या पत्रकारांना कोरोना ची झळ बसत आहे. त्यामुळे सरकारी व खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये पत्रकारांचा मोफत उपचार करण्यात यावा ,असे आदेश सरकारने राज्यातील पत्रकारांसाठी काढावेत ,अशी मागणी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल चे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार यासीन पटेल, अध्यक्ष गणेश कोळी ,विश्वस्त विकास कुलकर्णी ,अतुल होनकळसे ,गणेश गोडसे यांनी केली आहे. पुणे येथे टीव्ही 9 चे पत्रकार रायकर यांच्या बाबत आरोग्य खात्याचा गलथान कारभार याची चौकशी व्हावी ,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
