कुतूहल न्यूज नेटवर्क
नेत्र चिकित्सा अधिकारी (वर्ग 3) अशोक शिंदे यांची बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला
पांगरी : पांगरी तालुका बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिकारी (वर्ग 3) अशोक शिंदे यांची शासकीय रुग्णालय सोलापूर येथे बदली झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राहक समिती व ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कलच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. श्री.शिंदे हे गेली सात वर्षेपासून या रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होते,या काळात त्यांनी अनेक रुग्णांची डोळ्यांची तपासणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राहक समिती तालुकाध्यक्ष विष्णू पवार,डॉ.रवींद्र माळी,ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कलचे गणेश गोडसे, इरशाद शेख आदीं मान्यवर उपस्थित होते.