fbpx

अक्कलकोट शहरातील “प्रियदर्शनी” सांस्कृतिक कार्यालयाची दुरवस्था

कुतूहल न्यूज नेटवर्क : दयानंद गौडगांव

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील एकमेव नगरपरिषदचे सांस्कृतिक कार्यालय “प्रियदर्शनी” सध्या बंद आहे.येथे कुठलेच कार्यक्रम होत नाहीत,गेल्या दोन तीन वर्षापासून दुरूस्ती च्या नावाखाली कार्यालय बंदच आहे.नेमके कधी चालू होणार आहे, हा नागरिकांना पडलेला यक्ष प्रश्न आहे.

गेल्या काही वर्षापासून अक्कलकोट शहराचे वैभव असलेले “प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन” सध्याची अवस्था अतिशय दयनीय आहे.स्थानिक प्रशासन नगरपरिषदने दुर्लक्ष केल्या मुळे अशी अवस्था झाली आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचा कार्यालय सध्या बंद आहे. सत्ता चालकांच्या डोळ्याला दिसत नाही का..? सांस्कृतिक भवन इतके दिवस बंद का आहे.?याकडे नगरपरिषदेचं लक्ष का जात नाही.? असे अनेक प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केले जात आहेत.

लोकप्रतिनीधी,स्थानिक प्रशासनाने “प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन” कडे तात्काळ लक्ष दिले पाहिजे.लवकरात लवकर पुन्हा या भवना मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सुरू व्हावे हिच तालुकावासींयांची माफक अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *