कुतूहल न्यूज नेटवर्क
तीन वर्षाच्या बालकाला जखमी करणाऱ्या सहा.पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांना तात्काळ निलंबित करा – फारूकभाई मटके
सोलापूर : गरीब रिक्षाचालक युसूफ पठाण उर्फ लालू पठाण यांच्या रिक्षावर हल्ला करून काच फोडून लहान मुलाला जखमी करणाऱ्या सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष फारुकभाई मटके यांनी सादर केले .
अधिक माहिती अशी की,रिक्षाचालक युसूफ पठाण हे दिनांक 03 सप्टेंबर 2020 रोजी पत्नी व मुलासह बोरामणी येथून जावून परत सोलापूला येत असताना हैद्राबाद चौत्रा नाका येथील पॉइंट वर असलेले सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ व काही पोलीस कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालकाला एक शब्द ही न विचारता रिक्षाच्या काचेवर हल्ला चढवला.व त्या हल्ल्यात रिक्षाचालकाची पत्नी व 3 वर्षाच्या मुलगा जखमी झाले होते.सदर घटनेची फिर्याद दाखल असून अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही.त्यामुळे श्री.मटके यांनी पालकमंत्र्याना निवेदन दिले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सादिक पठाण, घुडुभाई शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सर्फराज शेख, शहर उपाध्यक्ष इरफान शेख, निशांत तारानाईक व रिक्षा चालक पठाण यांचे कुटुब व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.