कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यातील पिंपळगाव (दे) शिवारात पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर धाड
पांगरी : पिंपळगाव (दे) ता. बार्शी येथील शिवारात तिरट जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर पांगरी पोलिसांनी कारवाई करून 1 लाख 13 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,पिंपळगाव ते येळंब जाणारे रोडला ओढ्या लगत झाडाखाली काही इसम तिरट नावचा जुगार खेळत आहे अशी बातमी पोलिसांना मिळाली होती.त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून बालाजी बापू मोरे,शंकर मोतीराम काळे,बाळू साधू माने,विजय गोवर्धन पालके सर्व राहणार पिंपळगाव (दे) ता. बार्शी व सचिन कैलास खुने रा. ममदापूर ता. बार्शी यांच्यावर कारवाई केली आहे.फिर्याद पोशि सर्जेराव कोळी यांनी दिली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट,हवालदार चौगुले,पोना मुंढे, होमगार्ड शिंदे व मुजावर यांनी केली आहे.