कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी
कृषिदूत कंपनी कडून सॅनिटायझर स्टँडचे वाटप
कारी : राज्यामध्ये शेती क्षेत्रात कार्य करणारी कृषीदूत बायोहर्बल नाशिक प्रा. लि. या कंपनीने बार्शी तालुक्यातील मळेगाव, जामगाव (पा), पिंपरी(सा) या गावातील ग्रामपंचायतिना सॅनिटायझर स्टँडचे वाटप केले आहे. या कंपनीने लॉकडाउन च्या कालावधीत बार्शी तालुक्यातील विविध गावात जंतुनाशक फवारणी करण्यासाठी 200 लिटर सोडियम हायड्रोक्लोराईड लिक्विड सामाजिक बांधिलकी म्हणून दिले होते.
यावेळी मळेगाव चे सरपंच गुणवंत मुंढे, कृषिदूत कंपनीचे प्रतिनिधी अलीम मुजावर, संतोष निंबाळकर, राहुल सातपुते, दत्तात्रय मस्के, विशाल जगदाळे, दीपक काळे, मारुती काटकर, हनुमंत सातपुते, युवराज काठमोरे, धनंजय काशीद, रामविजय वायकर, समाधान सुतार, सुरेश काशीद उपस्थित होते