कुतूहल न्यूज नेटवर्क :
बार्शी तालुक्यातील पूर्व भागात अतिवृष्टि ; पिकांचे मोठे नुकसान
बार्शी : बार्शी तालुक्यातील पांगरी,पांढरी,उक्कडगांव,चिंचोली ममदपूर,जहानपूर आदी गावात शुक्रवारी मध्यरात्री अतिवृष्टि झाली.त्यामुळे याभागातील शेतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. याभागात काढणीला आलेले सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतकऱ्यांनाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.