कुतूहल न्यूज नेटवर्क
उद्याच्या सोलापूर जिल्हा बंदला मौलाना आझाद विचार मंचचा पाठिंबा
बार्शी दि. 20 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे उद्या सोमवार दि.21 सप्टेंबरला संपूर्ण सोलापूर जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाजाने दिली आहे.ह्याच बंदला मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल यांनी पाठिंबा दिला आहे.
यावेळी पटेल कुतूहल शी बोलताना म्हणाले की,आम्हाला थोरल्या भावाप्रमाणे प्रेम देणाऱ्या व प्रत्येक अडचणीत धावून येणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.त्यामूळे उद्याच्या बंदला मौलाना आजाद विचार मंचकडून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत.