कुतूहल न्यूज नेटवर्क: दयानंद गौडगांव
सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट : मराठा आरक्षण स्थगिती विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने आज २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण सोलापूर जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आला होती. या बंदला सोलापूरसह अक्कलकोट शहरात कडकडीत बंद पाळला जात आहे.
दरम्यान या बंदला जिल्ह्यातील सर्वच राजकीय व सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात पाठींबा दर्शविला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनीही पाठिंबा दिला आहे.