कुतूहल न्यूज नेटवर्क : अशोक माळी
बार्शी तालुक्यात सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करा-राहुल भड
बार्शी : बार्शी तालुक्यातील १० सर्कल विभागात, सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.तालुक्यात गेली दहा दिवस झाले आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सध्या सोयाबीन पीक काढणीच्या भरात आलेले आहे, त्याच वेळी सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे.सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे अशी मागणी राहुल भड यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कोरोनाच्या संसर्ग रोगामुळे गेली पाच सहा महिन्यापासून शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही, तसेच जून महिन्यात पाऊस समाधानकारक पडल्यामुळे सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात तालुक्यात पेरणी झालेली होती. त्यातच काही शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही, त्या शेतकऱ्यांना दुबारा पेरणीचे संकटाला सामोरे जावे लागले आहे.शेतकरी अशा संकटातून सावरतो ना सावरतो की, पीक काढणीच्या वेळी गेली दहा दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे त्वरित नुकसानीचे पंचनामे व्हावे म्हणून तहसीदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी भास्कर काकडे,युवराज काजळे,प्रमोद पाटील,प्रशांत भड,संदीप भड आदीं उपस्थित होते.