दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
रिक्षा व्यवसायावरील सर्व निर्बंध हटवा,८ दिवसात सर्व मागण्या पूर्ण करा अन्यथा कायदेभंग आंदोलन : बाबा कांबळे
पिंपरी-चिंचवड : १) रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिना दहा हजार मिळावे, २)शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे त्यांची आर सी बुक कोरे करावे ३) मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेर वर निर्बंध आणावेत,४) रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे,५) फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुली साठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे, याबाबत सक्त वसुली आणि गुंडागर्दी दादागिरी करू नये असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स आणि बँकांना द्यावेत ६) रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना राबवावी.७)रिक्षा चालक मालकांसाठी covid-19 च्या काळात 50 लाखाचा विमा मिळावा.
यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी १२ वाजता पुणे येथील आर टी ओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आणि राज्य सरकारने लक्ष न दिल्यामुळे आणि रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे रिक्षा चालकांनी संताप व्यक्त करत सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. आठवले गट महासचिव बाळासाहेब आठवले यांनी उपस्थित राहुन पाठींबा दिला आणि मार्गदर्शन केले. यावेळी पुणे शहर महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे कार्याध्यक्ष शफिक पटेल, हर्षद अन्सारी ,सुहास कदम, कुमार शेट्टी ,संजय शिंदे , कमलेश काळे,सय्यद ,फरहान शेख,हसन शेख ,संजय उजळेकर आदी उपस्थित होते, तसेच आनंद अॅटो संघटना गणेश थोरात के साई अॅटो संघटना मुबारक शेख, प्रवीण भोसले पीएस अमर ऑटो संघटना कैलास शिवकर (पुणे स्टेशन) हरेमस ऑटो संघटना युसुफ मलिक (शास्त्रीनगर)रिक्षा ब्रिगेट महा. राज्य समन्वयक बाळासाहेब ढवळे, निलेश वाघुल ,संतोष मस्के यांनी सुद्धा उपस्थित राहुन पाठींबा दिला.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले सरकारने एस टी बस ला तसेच मुंबईमध्ये बेस्ट आधी पुण्यात पीएमसी वाहतुकीस परवानगी दिली परंतु रिक्षा व्यवसायात मात्र अनेक बंदी घालण्यात आली आहेत, आज रोजी 70% रिक्षा बंद आहेत गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात अन्यथा रिक्षाचालक अभिनय कायदेभंग करत आपले रिक्षा सुरू करतील तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बोंबाबोंब आंदोलन सुरूच राहणार आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.