बार्शी प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
वैरागचे पोलीस कॉ बहिरे अँटीकरप्शनच्या जाळ्यात
बार्शी : वैराग पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस कॉ. ईसामिया बाशामियां बहिरे यांना तीन हजाराची लाच घेताना काल गुरूवारी १ आक्टोबर रोजी ॲन्टिकरप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केले आहे .
सविस्तर वृत्त असे की,यातील तक्रारदार यांचे विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यांचे तपासात मदत करण्यासाठी व पुढील कारवाई न करण्यासाठी पो काॅ बहीरे यांनी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी कली, तडजोडी अंती पाच हजार रुपये लाच मागणी करून, त्यापैकी पहिला हप्ता म्हणून तीन हजार रुपये लाचेची रक्कम पो काॅ बहिरे यांनी स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडले आहे.
हि कारवाई पोलीस निरीक्षक कविता मुसळे,पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे,पोना चंगरपल्लु, पोना स्वामी, पोशि सन्नके, चालक पोकॉ सुरवसे, सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर यांनी केली आहे.