fbpx

बार्शीतील ‘त्या’ शेतकरीपुत्राने घेतली शरद पवारांची भेट

बार्शी प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी तर दुसरीकडे खराब हवामानामुळे अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी शेतकरी पुत्रांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र सिनेकलावंत, राजकीय नेत्यांची भेट घेणाऱ्या राज्यपालांनी दखलही घेतली नाही. मात्र, माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या युवा शेतकऱ्यांना वेळ देत त्यांचे गाऱ्हाणे ऐकूण घेतले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुले असणारे बार्शी तालुक्यातील विरेश आंधळकर, पंकज चिवटे व निखिल सातपुते यांनी आज पंढरपूर येथे खा शरद पवार यांची भेट घेत कांदा उत्पादकांच्या अडचणी मांडल्या, यावेळी पवार यांनी सविस्तरपणे एकूण घेत सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी, नैसर्गिक संकट, केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची मुले म्हणून आम्ही यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. आज माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची पंढरपूर येथे भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा झाली. साहेबांनी देखील दखल घेत पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले असल्याचं विरेश आंधळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *