वैराग प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
डाळिंबाचे बी श्वसन मार्गात अडकल्याने डॉक्टर दांपत्याच्या मुलीचा मृत्यू
वैराग: बार्शी तालुक्यातील वैराग येथे कार्यरत असलेले दंत चिकित्सक डॉक्टर संदीप घोरपडे व डॉक्टर राजश्री घोरपडे या डॉ. दांपत्याच्या साडेतीन वर्षाच्या मुलीचा डाळिंब खाताना त्यातील बी श्वसन मार्गात अडकल्याने मेंदूवर जबर घात झाला, त्यात चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौरवी घोरपडे असे तिचे नाव असून ते डॉ . दाम्पपत्याची मोठी मुलगी आहे.रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.
15 दिवसांपूर्वीच्या आईबरोबर लातूर येथे तिच्या मामाकडे गेली होती. तिने डाळिंब खाताना त्यातील बी श्वसन मार्गात अडकल्याने मेंदूवर जबर आघात झाला, त्यानंतर त्यावर लातूर व त्यानंतर सोलापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते ,मात्र बारा दिवसानंतर ही प्रतिसाद न दिल्याने तिला अखेर शुक्रवारी वैराग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज सौरवीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे वैरागच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.