आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
‘असून अडचण, नसून खोळंबा ‘; कारीचे 33/11 के. व्ही विद्युत उपकेंद्र
कारी दि.11 : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील 33/11 के. व्ही विद्युत उपकेंद्राचा विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने गावातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. उद्या दि 12. ऑक्टोबर पासून अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरु होत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, या परीक्षा घरी बसून मोबाईल, संगणक, लॅपटॉप च्या माध्यमातून देयच्या आहेत परंतु अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये चार्जिंग नसल्याने ते बंद झाले आहेत.
“कारी येथील विद्युत उपकेंद्राचा विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे. मी महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क साधला आहे त्यांना लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्यास सांगितले आहे.” शिवाजी दादा गायकवाड,माजी उपसरपंच,विद्यमान ग्रा. पं .सदस्य.
“उद्यापासून आमच्या अंतिम वर्षातील ऑनलाईन परीक्षेस सुरुवात होत आहे. या परीक्षा घरी बसून मोबाईल, संगणक, लॅपटॉप याच्या द्वारे द्यायच्या आहेत परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आमचे मोबाईल मध्ये चार्जिंग नसल्याने मोबाईल बंद झाले आहेत.” सुरज सारंग,विद्यार्थी.
विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे गावातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे, गावातील राजकीय मंडळींनी यात लक्ष घालून विद्युत उपकेंद्राचा सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करावा.” प्रदीप चव्हाण,ग्रामस्थ
या उपकेंद्राचे विद्युत सहाय्यक अभिजित कोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही
खूप अथक प्रत्यनाने कारी गावाला विद्युत उपकेंद्र मिळाले परंतु उपकेंद्राचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने संपूर्ण गावाला अंधारात रात्र काढावी लागत आहे.सध्या ताळे बंदीमुळे अनेक विद्यार्थी मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करत आहेत. बऱ्याच घरांमध्ये लहान लहान बालके आहेत पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे .यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे गावातील राजकीय मंडळींनी यात लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.