बार्शी प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी व पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड उपचारास मंजुरी
बार्शी : कोविड-१९ रूग्णांसाठी स्वतंत्र १० खाटांचे शासकीय उपचार केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांनी दिलेआहे. रूग्णांसाठी १० ऑक्सिजन बेड व पांगरी येथील ग्रामीण रूग्णालयात कोरोनाबाधित गरोदर मातांसाठी १० ऑक्सिजनबेड व इतर कोविड रूग्णांसाठी १०ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.यावेळी राजेंद्र मिरगणे यांनी दि.२६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे बार्शी व पांगरी येथील ग्रामीण रूग्णालयात कोविड-१९ व इतर रूग्णांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.
राजेंद्र मिरगणे यंग बिग्रेडच्या वतीने राजेंद्र गायकवाड,सचिन ढाकणे, प्रमोद कांबळे, भगवान साठे,बाजार समितीचे संचालक कुणाल घोलप,शिरीष घळके, अविनाश शिंदे, बाळासाहेब पवार, ज्योतीराम शेळके, संभाजी आगलावे,बाबा शेख, एकबाल शेख, जहाँगीर शेख,अश्विन गाढवे, मांडेगावचे सरपंच पंडीत मिरगणे, रविंद्र सांगोळे, सौ.पद्मजा काळे,सौ प्रतिभा मुळीक, शरीफ शेख, दिलदार तांबोळी, महेदिमियाँ लांडगे, शाम शिंदे,अमोल ओहाळ आदी ऑक्टोंबर रोजी रिक्षारॅली काढून तहसिलदारांना निवेदन देऊन सोमवारपर्यंत कार्यवाही न झाल्यास उघ्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.