कुतूहल न्यूज नेटवर्क
पूरग्रस्त विस्थापितांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप
मोहोळ दि.17 : भीमा नदीला आलेल्या पुरामुळे विस्थापित झालेल्या मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथील कुटुंबाना भारतीय जनता पक्षाचे नेते संजय क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून कै.अभिजित क्षीरसागर प्रतिष्ठानच्या वतीने जीवनोपयोगी साहित्याचे वाटप जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पडलेल्या अतिवृष्टीमुळे व उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी घोडेश्वर ता. मोहोळ या गावांमध्ये शिरले. त्यामुळे या भागातील पंधरा कुटुंबाचे स्थलांतर सुरक्षित स्थळी जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले. यावेळी सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या आणि खऱ्या अर्थाने ‘लोकसेवक’असलेल्या संजय क्षीरसागर यांनी कै.अभिजीत क्षीरसागर प्रतिष्ठानच्या वतीने पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबाना आठवडाभर पुरेल एवढे जीवनावश्यक किराणा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या जीवनावश्यक साहित्यांचे वाटप आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील मान्यवर नेते मंडळी मार्फत करण्यात येत आहेत तर काही येऊन गेले. मात्र विस्थापित झालेल्या कुटुंबाना जीवनावश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्याचे औदार्य लोकसेवक संजय क्षिरसागर यांनी दाखवले. यावेळी संजय क्षीरसागर यांनी केलेल्या मदतीबद्दल पूरग्रस्त कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त केली .
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, बेगमपूरचे सरपंच हरिभाऊ काकडे, डॉ.बाळासाहेब सरवळे, माजी सरपंच विनोद सोनवले, माजी उपसरपंच हणमंत कावळे, सादिक तांबोळी, दीपक गवळी, दीपक पुजारी, विशाल पवार, विवेक पाटील, पंचाक्षरी स्वामी, चंद्रकांत भोई, अंकुश जगताप, अरविंद माने, आदी उपस्थित होते.