कारी प्रतिनिधी : शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी कारी येथिल अमोल जाधव यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते देण्यात आले. अमोल जाधव हे मागील पाच वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहेत.
ते महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष म्हणून ही काम करीत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतात शिवस्मारक युवा समितीच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे अमोल जाधव यांनी सांगितले त्यांच्या या निवडीने सर्वांकडून त्यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.