
मोहोळ :कोल्हापूर येथे आयोजित तंत्र प्रदर्शन व विविध गुण दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शासकिय आद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहोळ मधील विजतंत्री व्यवसायातील दिपक चव्हाण, ओंकार क्षीरसागर या प्रशिक्षणार्थी यांनी वीजनिर्मिती, विजवाहन व वीजवितरण कश्या प्रकारे केले जाते याचे वास्तविक प्रात्यक्षिक सुंदर रितीने सदर करून पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कोपा व्यवसायातील प्रियांका पाटील हिने गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी मार्गदर्शक श्री भांगे सर, सौ. भोसले मॅडम. श्री हिरेमठ सर , जिल्हा समन्वयक श्री मोटे सर आणि प्राचार्य श्री हरिदास साहेब व इतर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या मिळालेल्या यशामुळे मोहोळ आय टी आय ने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून औरंगाबाद येथील राज्य स्तरीय तंत्र प्रदर्शन व गायन स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थी व निदेशक यांचे सत्कार आणि अभिनंदन कोठारी समूहाचे एम डी तसेच मोहोळ आय टी आय येथील आय एम सी कमिटी चे अध्यक्ष श्रीयुत उज्वल कोठारी साहेब यांनी केला. व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटनिदेशक श्री गोलेकर सर, सौ खामितकर मॅडम, श्री हिप्परगे सर, श्री गायकवाड सर,सौ. देशमुख मॅडम, कुसेकर सर, सौ ठोंबरे मॅडम, श्री काकडे सर, श्री बचुटे सर, श्री पवार सर, आणि श्री बागणीकर सर , सौ मकवाना मॅडम व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.