आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथिल मुखतार युसुफ मुलाणी यांना ५ ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन २०२० चे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला याबद्दल कारी ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्यावर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुखतार मुलाणी हे स्वामी विवेकानंद विद्यालय गोरमाळे ता बार्शी जि सोलापूर याठिकाणी २२ वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.त्यांना २०१८ यावर्षी सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाकडून पुरस्कार देण्यात आला होता.ते लर्नमेट्स फाउंडेशनचे सोलापूर जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत.
कारी चे सुपुत्र मुखतार मुलाणी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ देवेंद्र डोके ,सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी, राजेंद्र देसाई, नितीन कात्रे, लहू ढेंबरे, मनोज शिंदे, विनायक ढेंबरे, संतोष गंभीर, प्रदीप कदम ,दीपक डोके, किरण गादेकर, काळू आटपळकर,शहाजान कोतवाल आदी ग्रामस्थ उपस्थित होते