बार्शी :-बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायाने जोर धरला आहे. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बार्शी तालुक्यातील खांडवी व गोडसेवाडी च्या मध्यभागी बाळासाहेब कदम याच्या मालकीच्या पत्राशेड मध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण दहा जुगार खेळणारे ताब्यात घेतले यासह मोबाईल, मोटर सायकल हा सर्व मुद्देमाल आणि रोख रक्कम यावेळी जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून बार्शीत जुगार अड्ड्यावर छापा
या छाप्यात गणेश कोंढारे, दिनकर लोमटे दोघे राहणार-चिखर्डे समाधान बारंगुळे, नारायण ननवरे दोघे राहणार-बार्शी, जयसिंह गव्हाणे, नितीन गव्हाणे दोघे राहणार-खांडवी सचिन ढोले राहणार-देवगाव तुकाराम सातपुते राहणार-खासगाव तालुका परांडा युवराज ताकभाते-श्रीपत पिंपरी, बालाजी वाडेकर राहणार-वाकडी बाळासाहेब कदम राहणार-खांडवी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रमोद तोरणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मुख्यालयाच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, दत्तात्रय झिरपे, अमर पाटील, मनोज राठोड, भीमाशंकर तोरणे या विशेष पथकाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
बार्शी तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बायपास व परिसरात अनेक जुगार अड्डे सुरू असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. याची दखल घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.