आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात सोशल डिस्टन्स चे पालन करत राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. यावेळी इंदिरा गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल, आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकात्मतेची शपथ यावेळी घेण्यात आली.
श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा
यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा व्ही. ए. पाटील, भूगोल विभाग प्रमुख प्रा एस. एम .केमदारणे, मराठी विभाग प्रमुख डॉ एन. आर . दनाने, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ पी .एस .गांधी, डॉ व्ही. पी .लिंगायत, प्रा के. टी. व्हनहुवे, डॉ जे. के. काशीद, जितेंद्र गाडे उपस्थित होते.