दयानंद गौडगांव: कुतूहल न्यूज नेटवर्क
दिवाळी खरेदीत छोट्या व्यवसायिकांना आधार द्या ; धोंडप्पा नंदे, अक्कलकोट घडामोडी
अक्कलकोट : अक्कलकोट घडामोडीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते धोंडप्पा नंदे यांनी दिवाळीनिमित्त जनतेला आवाहन केले आहे. कोरोना मुळे छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे,आर्थिक घडी बिघडलं आहे त्यात रोज पोटाची खळगी साठी व्यवसाय करणाऱ्या लहान व्यवसायिक अवस्था गंभीर आहे.
दिवाळी निमित्त शहरात किंवा ग्रामीण भागात गृहोपयोगी वस्तू, झाडू विक्रेते यांसारखे अनेक छोटे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला ग्राहकांची वाट बघत बसलेला आपल्याला पाहायला मिळतो.शक्य तेवढे अशाकडे दिवाळी खरेदी करुन त्याना आधार द्या,यामुळे त्यांची दिवाळी गोड होऊ शकते. असे आवाहन धोंडप्पा नंदे यांनी केले आहे.