आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी-कारी एस.टी. बस सेवा सुरू
कारी : कोरोनाचे सर्वत्र सावट असल्याने बससेवा अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता परिस्थिती नियंत्रणात येताच एस.टी. महामंडळाने बसेच चालू करण्याचा निर्णय घेतला.ग्रामीण भागातील नागरिकां ची बसेस बंद असल्याने मोठी गैरसोय होत होती तब्बल आठ महिन्यानंतर कारी गावात लालपरीच आगमन झाले. बार्शी आगारातून सद्या दोन फेऱ्या चालू करण्यात आलेल्या आहेत या बसेस सुरू केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना आता प्रवास करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे.