दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
निगडीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; चार लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
निगडी :निगडी बसस्टॉप जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर निगडी पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. निगडी येथील पवळे उड्डाणपुलाजवळ असलेल्या बस स्टॉपच्या मागील बाजूच्या गाळ्यांमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता. यामध्ये पोलिसांनी तब्बल ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करत २४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विजय शंकर रोमन (वय ४८), मुन्ना उर्फ विजयकुमार महादेव शर्मा (वय ३५), शरद सुभाषचंद केसरवानी (वय ३२) यांच्यासह २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या छाप्यामध्ये पोलिसांनी ५५ हजार ३० रुपये रोख रक्कम, ६३ हजार ४०५ रुपयांचे जुगाराचे साहित्य, एक लाख ४ हजारांचे १३ मोबाईल फोन, एक लाख ९५ हजारांच्या ६ दुचाकी असा एकूण ४ लाख १७ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे, पोलीस उप निरीक्षक महेंद्र आहेर, केरबा माकणे, सहाय्यक फौजदार मछिंद्र घनवट, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतिश ढोले, शंकर बांगर, शिवाजी नागरगोजे, विनोद व्होनमाने, अमोल सांळूखे, विजय बोडके, उमेश मोहीते, सोपान बोधवड, कंठय्या स्वामी यांनी केली आहे.