कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुकान जळून खाक
पांगरी प्रतिनिधी, दि. ०२ नोव्हेंबर : पांगरीत श्री. माऊली जनरल स्टोअर्स या दुकानात आग लागून आतील विक्रीचे मोबाईल व साहित्य,फर्निचर,कोल्ड्रिंक्स,सुपारी व पान मटेरियलचे साहित्य व फ्रीज जळून खाक झाले.
अधिक माहिती अशी की, एसटी स्टँड समोरील श्री.माऊली जनरल स्टोअर्स चे मालक राहुल पवार यांनी नेहमी प्रमाणे दिनांक ०१ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी गेले.सुमारे रात्री ११:३० वाजता त्यांना त्यांच्या मित्राने फोन करून सांगितले की,तुझ्या दुकानातून खूप धूर निघत आहे.राहुल पवार यांनी लगेच दुकानाकडे धाव घेवून दुकान उघडले असता,त्यांना आग लागल्याचे दिसले.त्यांनी १० ते १५ गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवली.पण आग विझेपर्यंत विक्रीचे मोबाईल व साहित्य, ,फर्निचर,कोल्ड्रिंक्स,सुपारी व पान मटेरियलचे साहित्य व फ्रीज जळून खाक झाले.त्यामुळे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.