fbpx

जगदाळे मामा हॉस्पिटलच्या सार्वजनिक शौचालयामध्ये ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : येथील जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे सार्वजनिक संडासमध्ये ३२ वर्षीय युवकाचे सडलेल्या अवस्थेत प्रेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हि घटना दि.११ नोव्हेबर रोजी सकाळी १० वा उघडकीस आली.तपासात रवी ऊर्फ रविंद्र पोपट गुंड वय ३२ वर्षे (रा.माऊली नगर कासारवाडी रोड बार्शी) असे मयताचे नाव असल्याचे समोर आले आहे.( The body of a 30-year-old youth was found in the public toilet of Jagdale Mama Hospital )

याबाबत सेक्युरीटी गार्ड दशरथ राऊत यांनी दिलेल्या खबरी म्हटले की हॉस्पीटलमधे डेड रुमच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक संडासपैकी दोन नंबर संडासच्या दरवाज्याची कडी लावलेली असल्यामुळे दरवाजा उघडला नाही . त्यानंतर बाहेरुन दरवाजा उघडण्याबाबत आवाज दिला परंतु आतुन कोणाचाही प्रतिसाद दिला नसल्याने संडासच्या असलेल्या वरच्या खिडकीतुन आत डोकावुन पाहीले असता  इसम मयत अवस्थेत त्याचे शरीर फुगलेले अवस्थेत ,वास येत असलेला दिसल्याने घटनेबाबत पोलीसांना कळविले यानंतर घटनास्थळी पोना. गणेश वाघमोडे, पोना श्रीमंत खराडे यांनी  येऊन दरवाजा तोडून पाहीले असता मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळुन आला मृतदेह ४ ते ५ दिवसापासुन संडास मध्ये पडुन असल्याचे प्राथमिक अंदाज आहे . याबाबत अधिक तपास बार्शी पोलिस करित आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *