कुतूहल न्यूज नेटवर्क
बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्राचा दुर्देवी मृत्यू
औरंगाबादमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील आपोगावच्या शिवराज सोमवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पिता-पुत्राची नावं अशोक सकाहरी औट (वय ५२) आणि कृष्णा अशोक औट (वय ३१), अशी मृतांची नावे आहेत.
मृत औट पिता – पुत्र सोमवारी रात्री शेतात गेले होते. बाप-लेकांना शेतात जाऊन बराच वेळ झाला तरी माघारी न परतल्यामुळे कुटुंबीय शेतात गेले होते. कुटुंबीयांना शेतात पिता – पुत्र मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसले. या घटनेची माहिती पैठण पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर दोन्ही विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
दिवाळीच्या सणांमध्ये येथील औट कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. तर आपेगावसह परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. दरम्यान गतवर्षी सुध्दा याच परिसरात एका शेतकऱ्याचा बीबट्याने बळी घेतला असल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.