fbpx

पांगरी येथे “माझे गाव,कोरोनामुक्त गाव” अभियान सुरु

कुतूहल न्यूज नेटवर्क :

पांगरी प्रतिनिधी,दि.८ डिसेंबर : बार्शी तालुक्यातील पांगरी येथे “माझे गाव,कोरोनामुक्त गाव “या अभियानाची सुरुवात शपथ घेवून करण्यात आली. यावेळी बार्शी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर सावंत, जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत यांनी आपले विचार व्यक्त केले. विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले यांनी उपस्थितांना माझे गाव,कोरोनामुक्त गावाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामसेवक संतोष माने यांनी तर आभार प्रशासक श्रीहरी गायकवाड यांनी मानले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश खेंदाड, डॉ. निशिगंध जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, माजी सरपंच जयंत म्हसे,बाबासाहेब शिंदे, इरशाद शेख,संतोष बगाडे,आरोग्य विभागातील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *