fbpx

पांगरी शिवारात २६ एकर उस जळुन ५२ लाखांचे नुकसान

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी प्रतिनिधी,दि.७ डिसेंबर : अज्ञात कारणावरूण सहा शेतकऱ्यांचा तब्बल २६ एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडुण ५२ लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील पांगरी शिवारात आज दि.७ सोमवारी पहाटे उघडकीस आला. मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी भेदरला असून आर्थिक नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी प्रशांत झालटे यांनी केली आहे.

प्रमोद झालटे,प्रशांत झालटे,जयसिंग पाटील,शुभाष निकम, आबासाहेब पाटील,हरिश्चंद्र माने अशी उस जळाल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद व प्रशांत झालटे यांची पांगरी-पाथरी रस्त्यालगत गट नंबर १०६,९७ मध्ये ऊस शेती आहे. त्यांच्या शेतात सुरूचा ऊस ड्रिपवर लावण्यात आला होता. ऊस कारखान्यास नेण्यायोग्य परिपक्व झालेला होता. मात्र काल रात्री अचानक त्यांचा तब्बल १८ एकर क्षेत्रातील ड्रिपसह ३६ लाख रूपयांचा ऊस जळुन खाक झाला.

तसेच शेजारील पाटील या शेतकऱ्यांचा दोन एकर ,शुभाष निकम दोन एकर,आबा पाटील दोन एकर व माने यांचा दोन एकर असा एकुण २६ एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडुण जळाला.आगीमध्ये ऊसासाठी करण्यात आलेले ड्रिप, पाईप आदी सर्व साहित्यही जळुन खाक झाले.अगोदरच विविध बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्याच मागे पुन्हा संकट येत असल्याचे दिसुन येत आहे.सध्या थंडीचे दिवस असताना ऊस नेमका कशामुळे जळाला याचा शोध घ्यावा अशी मागणी केली जात आहे. याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात घटनेची खबर देण्यात आली आहे.

दरम्यान गाव कामगार तलाठी श्रीकांत शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून पंचनामा केला.पंचनामा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *